चिंता वाढली ; ४० हजार जणांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

चिंता वाढली ; ४० हजार जणांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

narendra modi

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.

दरम्यान आता गेल्या काही दिवसांपासून लसीकरण वाढले असल्याने सध्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु आता आलेल्या एका अहवालामुळे केंद्र सरकारसमोरील चिंता आणखी वाढली आहे. केरळमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या तब्बल 40 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता हा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रकोप आहे का? किंवा प्रतिकारशक्ती नष्ट करणारा अन्य कोणता नवीन व्हेरिएंट तर सक्रिय झालेला नाहीय ना? याची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारने रुग्णांची माहिती आणि सँपल मागवले आहे. तसेच आता केंद्र सरकारने केरळ सरकारला संक्रमित रुग्णांची माहिती पाठवण्यास सांगितले आहे. तसेच लस घेतल्यानंतरही वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे सरकार चिंतेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या