चिंता वाढली : शाळा सुरु करताच ६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

school

नवी दिल्ली : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. हरियाणामध्ये शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला आहे. फतेहाबादमध्ये सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या मुलांना सध्या घरी आयसोलेट करण्यात आलं आहे. सरकारी शाळेतील मुलं कोरोना संक्रमित आढळून आली आहेत.

विद्यार्थी कोरोना पॉ़झिटिव्ह आढळून आल्यानंतर आता पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचं सँपल घेण्यास सांगितलं आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी आणि खासगी शाळांना विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या