राज्यपालांनी ‘त्या’ महिला पत्रकाराची मागितली माफी !

टीम महाराष्ट्र देशा : सेक्स फॉर डिग्री प्रकरणात आधीच अडचणीत सापडलेले तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे महिला पत्रकाराच्या गालाला तिच्या परवानगीशिवाय हात लावल्याने वादात सापडले होते. ‘पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला,’ असं महिला पत्रकारानं ट्विट केल्यानंतर सर्वच स्थरातून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

दरम्यान, या वादानंतर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सदर महिला पत्रकाराची माफी मागितली आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम यांना पाठवलेल्या आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, मी तुम्हाला माझ्या नातीसमान मानून गालाला हात लावला होता. मी पत्रकार म्हणून तुमचे कौतुक करण्याच्या इराद्याने असे केले होते. कारण मी स्वत: 40 वर्षे पत्रकार म्हणून काम केले आहे. या प्रकरणी लक्ष्मी यांनी माफीनामा स्वीकार केला असला तरी बनवारीलाल पुरोहित यांनी त्या कृतीमागे मांडलेला तर्क अमान्य केला आहे.

 

You might also like
Comments
Loading...