अनुष्काची सिक्युरिटी वाढवली; घरच्यांना देखील भेटता येणार नाही…

विराट-अनुष्का

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन झालं आहे. विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली आहे. मात्र यावेळी विराटने थोडी प्रायव्हसी द्यावी अशी विनंतीही चाहत्यांकडे केली होती.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या देशातल्या स्टार कपलच्या येणाऱ्या बाळाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांची उत्सुकता ताणत होती. अखेर ११ जानेवारीला अनुष्काने ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सध्या जवळच्या नातेवाईकांनाही हॉस्पिटलमध्ये अनुष्काला भेटण्याची परवानगी नसल्याचं सांगितलं जात आहे.

यावेळी विराट-अनुष्काने कोणाकडूनही फुलं किंवा भेटवस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड वातावरणात दोघांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या कर्मचार्यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमधील सुरक्षाही आधीपेक्षा वाढवण्यात आली आहे. तर मुलगी कोणालाही दिसू नये वा कोणीही फोटो काढू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या