विराटही गोंधळात पडेल; सोशल मीडियावर हुबेहुब अनुष्काचा धुमाकूळ

टीम महाराष्ट्र देशा – सोशल मीडियावरसध्या एका अमेरिकन सेलिब्रिटीचा फोटो व्हायरल झाला आहे. ती हुबेहुब अनुष्का शर्मासारखी दिसत आहे. हे फोटो पाहून अनुष्काचा पती हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीही गोंधळात पडेल असे नेटकरी म्हणत हा फोटो व्हायरल करत आहेत.

खरतर सोशल मीडियावर सतत सिनेकलाकारांसारख्या दिसणाऱ्या लोकांचे फोटो व्हायरल होत असतात. असाच प्रकार सध्या अभिनेत्री अनुष्का शर्माबाबत होत असल्याचे दिसत आहे.

अनुष्का शर्मासोबत व्हायरल होत असलेल्या या सेलिब्रिटीचे नाव आहे ज्यूलिया मायकल्स. व्यवसायाने ज्यूलिया ही गायिका आहे. सोशल मीडियावर या दोघांचा एकत्रीत केलेला फोटो व्हायरल होत असून या दोघींमध्ये कमालीचे साम्य दिसत आहे. अनेकांनी या दोघांचे फोटो शेअऱ करून नक्की अनुष्का कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका युझरने लिहिले आहे की, ‘अनुष्का ही खरंच तू आहे का? हा फोटो पाहून मी गोंधळात पडली आहे. दोघीही सुंदर आहेत. ज्यूलिया तुला पाहून आनंद झाला आहे.