Anushka Sharma। नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने हॉटेलच्या खोलीचा व्हिडिओ लीक झाल्याची तक्रार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिने देखील संताप व्यक्त केला आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाली आहे. विराट कोहलीसह टीम इंडिया सध्या पर्थमधील क्राउन टॉवर्स हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे.
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ‘काही घटना याआधीही अनुभवल्या आहेत, ज्यामध्ये काही चाहत्यांनी कोणतीही दया किंवा विनम्रता दाखवली नाही. परंतु ही खरोखर सर्वांत वाईट गोष्ट आहे. हे एका व्यक्तीच्या खासगी आयुष्याचा अपमान आणि त्याच्या अधिकारांचं उल्लंघन आहे. हे पाहून जर कोणी असा विचार करत असेल की सेलिब्रिटी आहे तर या गोष्टींचा सामना करावा लागेल, तर तुम्हीदेखील या समस्येचा एक भाग आहात. काही प्रमाणात आत्मनियंत्रण प्रत्येकाने करावं. तसंच जर हे तुमच्या बेडरुममध्ये होत असेल तर मर्यादेची सीमा कुठे आहे?, असा सवाल अनुष्काने उपस्थित केला आहे.
या घटनेनंतर हॉटेल व्यवस्थापकांनी विराट कोहलीची माफी मागितली आहे. हा व्हिडिओ हॉटेलच्या एका कर्मचाऱ्यानेच बनवला आहे. यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला क्राऊन खात्यातून काढून टाकण्यात आले आहे. विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोहली हॉटेलच्या खोलीत नसताना ही घटना घडली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया क्राउन टॉवर्स हॉटेलमध्ये थांबली होती. हा व्हिडिओ त्याच हॉटेलमधला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोहली राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीत ठेवलेले सर्व काही दाखवण्यात आले आहे. यामध्ये शूज, किचन आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर विराट संतापला. सोशल मीडियावर एक लांब आणि रुंद पोस्ट लिहून त्याने आपल्या गोपनीयतेबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी याला गोपनीयतेचा भंग असल्याचे म्हटले आहे.
कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लिहिले, ‘मी सहमत आहे की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदित आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मी नेहमीच कौतुक केले आहे. पण हा व्हिडिओ भयंकर आहे आणि त्यामुळे मला माझ्या गोपनीयतेबद्दल खूप विचार करायला लावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | मनसे, भाजप आणि शिंदे गटाची महायुती होणार का?, राज ठाकरे म्हणाले…
- Nana Patole | “खोके घेतल्याचं आमदारच मान्य करतात, त्यामुळे माफीने वस्तुस्थिती बदलणार नाही”
- Volvo EX90 Launch | Volvo ची इलेक्ट्रिक SUV EX90 ‘या’ दिवशी होऊ शकते लाँच
- Virat Kohli । हॉटेल रूमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहलीची बीसीसीआयकडे तक्रार
- Morbi Bridge | मोरबी पूल पडला की पाडला?, तरुणांची मस्ती अनेकांच्या जीवावर बेतली, पाहा व्हिडीओ