12वी पास विराट कोहलीला मिळाली पोस्ट ग्रॅज्यूएट बायको

virat-anushka-reception

मुंबई– अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांचे एज्यूकेशन किती आहे याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. 

विराट कोहली फक्त 12 वी पास आहे. त्याने विशाल भारती पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 1998 मध्ये विराट कोहलीने वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमी जॉईन केली आणि पूर्ण लक्ष्य क्रिकेटवर केंद्रीत केले.

अनुष्काने आर्ट्समधून बॅचलर डिग्री मिळविली आहे. त्यानंतर इकॉनॉमिकमधून तिने मास्टर्स डिग्री पूर्ण केली. मुलाखतीत अनुष्काने सांगितले होते, की मी स्कूल आणि कॉलेजमध्ये टॉपर होते. माझे ध्येय निश्चित होते, की मला मॉडेलिंगच करायचे आहे. मॉडेलिंग करायचे हे निश्चित असतानाही मी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.

लोक माझ्या आई-वडिलांना म्हणायचे की तुमची मुलगी मॉडेलिंग करते? तेव्हा ते त्यांना सांगत की ती शाळा-कॉलेजात टॉपर राहिली आहे.