‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’

मुंबई : भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक देशातील खेळाडू एकत्र येऊन वेगवेगळ्या संघात वेगवेगळ्या देशातील खेळाडूसोबत खेळतात. याच आयपीएलमधील दोन प्रमुख संघाच्या कर्णधाराच्या पत्नी या लहानपणी एकाच शाळेत शिकत होत्या अशी माहिती समोर आली आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली या दोघांची पत्नी म्हणजे साक्षी धोनी आणि अनुष्का शर्मा या एकाच शाळेत शिक्षण घेतले आहे. याप्रकारे त्या दोघी शालेय मैत्रीणी होत्या. २०१३ मध्ये एका मुलाखतीत अनुष्काने हा खुलासा केला. एकदा सहज बोलता बोलता साक्षीने सांगितले की ती आसामधील एका गावात राहत होती. यावर अनुष्काने गावाचे नाव विचारले असता साक्षीने सांगितलेल्या गावात ती पण राहत होती असे अनुष्काने सांगितले.

जेव्हा साक्षीने शाळेचे नाव सांगितले तेव्हा ती शाळाही एकच होती. या दोघीही आसाममधील मार्घेरिता येथील सेंट मेरी स्कूलमध्ये शिकल्या होत्या. त्यांचे काही फोटोही त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. या फोटोबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली की ‘या फोटोत साक्षी ही राजकुमारीसारखी आणि मी माधूरीप्रमाणे घागरा असा पोषाख घातला होता.’ असे अनुष्काने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या