fbpx

अनुष्का व विराट एका नवीन नात्यात.

अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या अफेयरची चर्चा नेहमीच असते. कोणत्याही कार्यक्रमात ते दोघे सोबत असतात. विराटने अनुष्का सोबत असलेल्या नात्यांचा कधीच खुलासा केला नाही. पण विराटच्या सोशल माध्यमावर नेहमी दोघांचे फोटो शेअर करत असतो. ते दोघेही नेहमी सोबत असतात.लवकरच विराट व अनुष्का एका नवीन नात्यात अडकणार आहेत.

अनुष्का व विराट एक नवीन व्यवसाय सुरु करणार आहेत. तुम्ही विचार करत असाल की हे दोघे लग्न तर करीत नाहीत ना ? नाही तस काहीच नाही. एका रिपोर्टनुसार अनुष्का व विराटने मुंबई व दिल्लीत जागा घेतली असून,त्या जागेत ते रेस्टॉरंट उघडणार  आहेत. लवकरच त्या रेस्टॉरंटच्या  कामाला सुरुवात होणार असून , काही दिवसात त्या रेस्टॉरंट विषयीची अधिक माहिती समोर येईल.अनुष्का व विराट चांगले मित्र मैत्रीण तर आहेत पण आता व्यावसायिक भागीदार देखील होणार आहेत.