रेल्वे अपघात रोखण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या अनुराग लांबोरच्या प्रकल्पास बेस्ट इंनोव्हेशन अवॉर्ड

टीम महाराष्ट्र देशा : रेल्वे अपघात रोखण्यासाठी सेन्सॉर तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे ‘अविष्कार २०१९’ स्पर्धेंतर्गत पुण्यातील ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी अभियांत्रिकी महाविद्यालायच्या प्रकल्पास बेस्ट इंनोव्हेशन (अविष्कार) साठी प्रथम पारितोषिक” मिळाले. मुंबई विद्यापीठात २८ जानेवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थी अनुराग लांबोर याच्या प्रयोगाला हे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन वेबसाईट माध्यमातून करण्यात आली. यातून विद्यापीठ स्तरावर प्रकल्प निवडण्यात आलेत्यानंतर हे प्रकल्प मुंबई विद्यापीठामध्ये आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आले. यात महाराष्ट्रातले 960 प्रकल्प निवडण्यात आले होते. रेल्वे अपघात रोखण्यासाठी सेन्सॉर तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेचे फाटक बंद करण्याची यंत्रणा तयार करण्याचा प्रकल्प अनुरागने सदर केला होता. या प्रकल्पासाठी त्याला हे पारितोषिक मिळाले आहे.

या विद्यार्थ्यांने रेल्वेचेअपघात रोखण्यासाठीचा सेन्सॉर तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेचे फाटक बंद करण्याची यंत्रणा तयार केली आहे. गेल्या काही वर्षातील रेल्वेचे अपघात पाहता हे अपघात रोखण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे होते. या स्पर्धेत आमच्या महाविद्यालयाच्या अनुराग लांबोर, ओंकार दहिवाल, गिरीश जाधव विद्यार्थ्यांला प्रथम पारितोषिक मिळाले. ही बाब आमच्यासाठी अत्यंत अभिमानस्पद आहे.
दतात्रय शंकर बोरमणे, प्राचार्य,

ही पूर्णपणे नवीन संकल्पना आहे आणि प्रत्यक्षात अंमलात येऊ शकते. यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे प्राण वाचतील. तसेच आमची लाइव्ह ट्रॅकिंग यंत्रणा सध्याच्या प्रणालीपेक्षा 80% स्वस्त आहे. ऑटो स्पीड कंट्रोलमुळे लांब पल्ल्याच्या दरम्यान ड्रायव्हर्सना विश्रांती मिळवून देणाऱ्या गाड्यांची धावपळ सुरळीत होते.
अनुराग लांबोर, विद्यार्थी