‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजनंतर अनुराग कश्यपचा येतोय ‘हा’ चित्रपट ; ‘नेटफ्लिक्स’वर ५ जूनला प्रदर्शित

Anurag Kashyap

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘चोक्ड’ असं या चित्रपटाच नाव आहे. या चित्रपटाची कथा नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रचण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून याट्रेलरमध्ये अमृता सुभाष, उपेंद्र लिमये यांसारख्या मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळते आहे.

सैय्यामी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील काम करणाऱ्या महिलेची भूमिका ती साकारत आहे. अचानक एके दिवशी तिला किचनच्या पाइपमधून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेल्या नोटांची बंडल मिळते. या पैशांमुळे तिचं आणि तिच्या कुटुंबीयांचं आयुष्य थोडंफार सुधारतं. मात्र तेव्हाच नोटाबंदीची घोषणा होते. यानंतर तिला सापडलेल्या पैशांचं काय होतं, ते पैसे कुठून येतात याची उत्सुकता हा ट्रेलर पाहून निर्माण होते.

‘चोक्ड’ या चित्रपटात तिच्यासोबत रोशन मॅथ्यू, अमृता सुभाष, राजश्री देशपांडे, उपेंद्र लिमये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सैय्यामी खेरने २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘मिर्झिया’ या चित्रपटात तिने अनिल कपूरच्या मुलासोबत मुख्य भूमिका साकारली होती.

#अम्फानचा_कहर ! भयंकर चक्रीवादळामुळे प. बंगाल-ओडिशामध्ये मोठे नुकसान, काहीजण दगावले

केंद्राने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास नाही का ? : पाटील

रोहितदादा आमच्या गावातून कोरोनाला घालवाना..! एका चिमुरडीचे रोहित पवारांना पत्र