आयकर कारवाईनंतर अनुराग कश्यपचे पहिले ट्विट

अनुराग

मुंबई : बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय.

आयकर विभागाने गेल्या 3 मार्चला अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह त्यांच्या संबंधितांच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या. मुंबई आणि पुण्यातल्या 30 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या धाडसत्रानंतर तापसीने ट्विट करत, टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले होते. आता अनुराग कश्यप यानेही हेटर्सला आपल्या खास शैलीत सुनावले आहे.

अनुरागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत तापसी पन्नूही दिसत आहे. ‘… आणि आम्ही #DoBaaraa सुरुवात करतोय. आमच्या हेटर्सला आमच्याकडून खूप सा-या शुभेच्छा, ‘ असे उपरोधिक ट्विट अनुरागने केले. ट्विटमधील तापसी व अनुरागचा फोटो ‘दोबारा’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या