अनुपम खेर यांची पहिल्यांदाच मोदी सरकारवर टिका, म्हणाले….

मुंबई : बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपन खेर हे त्यांच्या अभिनयासाठी सर्वदुर प्रसिद्ध आहे. बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही त्यांनी आभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयाव्यतीरिक्त ते वैयक्तीक जिवनात परखड मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. मात्र आता त्यांनी नेहमी मोदी सरकारच्या विरोधात मत व्यक्त केले आहे.

अनुपम खेर हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ बोलताना आढळले आहेत. अनेकदा त्यांनी मोदींच्या विरोधकावर तोफ डागलेली आहे. मात्र देशातील कोरोना परिस्थीतीवर बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीती ते म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थीतीत लोकांचा जिव वाचवायला प्राधान्या दिले पाहिजे. यावेळी केंद्र सरकारने आपल्या प्रतिमा बनवण्यापेक्षा देशातील नागरिकांच्य जिवाला प्राधान्य दिले पाहिजे असे म्हणले. देशातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीला केंद्र सरकारला जबाबदार धरणे गरजेचे आहे. ‘ असे ते म्हणाले.

कोरोनामुळे देशात आणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे. रोज वाढणारी रुग्णसंख्या आणि होणारे मृत्यु हे खुप भयानक आहे. याच परिस्थीतीवर बोलताना अनुपम खेर यांनी केंद्र सरकारने सध्या देशासमोर असलेल्या समस्यांचा सामना करायला हवा. देशातील नागरिकांनी त्यांना निवडून दिले आहे. आता त्यांच्यासाठी काही करण्याची हीच वेळ आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP