अनुपम खेर यांचा ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

anupam-kher-as new cheairman of ftii

टीम महाराष्ट्र देशा- प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण एका इंटरनॅशनल शो मुळे व्यस्त असल्याचे कारण त्यांनी राजीनामा दिला आहे.गजेंद्र चौहान यांच्यानंतर अनुपम खेर एफटीआयआयचे अध्यक्ष बनले होते. त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हातात घेतला होता.

गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, त्यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. भाजपाच्या जवळ असलेल्या व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. पदभार स्वीकारल्याच्या वर्षभरातच अनुपम खेर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.