विरोधकांची आघाडी राष्ट्रविरोधी, लादेनवादी स्वरूपाची; भाजप नेत्याची मुक्ताफळे

blank

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपविरोधात एकत्र येत सर्व विरोधी पक्षांनी मोट बांधल्याने भाजपला पोटनिवडणुकीत दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. १४ जागांपैकी भाजपला केवळ २ जागाच जिंकता आल्या होत्या. त्यामुळे आता भाजप नेत्यांकडून विरोधकांच्या एकजुटीवर टीका करण्यात येतीये.

टीका करताना भाजपच्या एका नेत्याने नवीन वाद ओढवून घेतला आहे. विरोधक व त्यांची आघाडी राष्ट्रविरोधी आणि तालिबानी स्वरूपाची असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. गिरीराज सिंग असं त्यांचं नाव आहे. ते भाजपचे खासदार आहेत. विरोधक हे माओवादी, जमीनदारी प्रवृत्तीचे (सामंतवादी), जातियवादी व लादेनवादी आहेत, असे भाजपाचे नेते खा. गिरीराज सिंग यांनी म्हटले आहे.

अर्थात हे एकत्र आले तरी त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली २0१९ च्या लोकसभा निवडणुकांतही भाजपा व एनडीएचाच विजय होईल. असं देखील त्यांनी सांगितले आहे. आता यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून, यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळा अशाचप्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.