शेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं ‘महाविकास आघाडी’ सरकार ‘शेतकरीविरोधी’ : राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. आज शिर्डीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीसह जिल्हास्तरीय नवीन कार्यकारिणीची निवड पार पडली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करणे चुकीचं असून नविन नेतृत्व तयारच होवून द्यायचं नाही, ही राज्य सरकारमधील लोकांची मानसिकता आहे. आपलीच पारंपरिक घराणी सत्तेत राहिली पाहीजे यासाठी हा निर्णय असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली.

Loading...

राज्यात पटसंख्येच्या नावाखाली सरकार शाळा बंद करायला निघालं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अती दुर्गम भागात शाळा आहेत, वाड्या-वस्त्यांवरच्या शाळा बंद झाल्या तर मुलांना पायपीट करावी लागणार असून गुलामांना जन्म घालणारी ही व्यवस्था आहे का? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारला.

शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली, असं असताना हे सरकार नेमकं कुणासाठी काम करतंय? असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी ला स्वाभिमानीचा विरोधच असून मुळ मुद्यांना बाजूला ठेवून हा निर्णय घेणे अयोग्य असून केंद्र सरकारची धोरणं शेतकरी विरोधी आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश