महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी एकत्र निवडणूक लढणार- बाळासाहेब थोरात

महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी एकत्र निवडणूक लढणार- बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

ठाणे : महाविकास आघाडी सरकार महापालिका निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते.यावेळी बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवरून भाजपला टोला लगावला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही, कॉंग्रेसच्या काळात एक रुपयाची जरी इंधन दरवाढ झाली तरी भाजपकडून आंदोलन केले जात होते. आता भाजपचे कार्यकर्ते लपून बसले आहेत का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

ईडीसारख्या यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर सुरू असल्याचे आता लहान मुलांनादेखील समजू लागले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चौकशी होत नसल्याने शांत झोप लागते, असे विधान केले होते. यावरच आता पाटील यांचे हे विधान भाजपमधील नेत्यांवर कारवाई होत नसल्याचा स्पष्ट पुरावा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या