मुंबई : अभिनेता अंशुमन विचारेच्या पत्नीने 1 एप्रिलला युट्यूबवर व्हिडिओ शेअर केला होता त्या व्हिडिओ मध्ये त्यांची मुलगी अन्वीनं बाळाला मांडीवर घेतलं असल्याचे दिसत होतं. अंशुमन बाबा झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. यानंतर अंशुमन विचारेवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता, अजूनही होत आहे. आता या सगळ्यानंतर अंशुमन विचारेच्या पत्नीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा सगळा एप्रिल फूलचा प्लॅन होता, असं म्हणत तिनं आम्हाला अन्वी एकच मुलगी असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेत हा प्लॅन आम्हाला चांगलाच महागात पडल्याचं देखील तिनं म्हटलं आहे.
अंशुमन विचारेच्या पत्नीनं युट्यूबवर व्हिडिओ शेअर कर म्हटलं आहे की, 1 एप्रिलला मी गंमत म्हणून एक व्हिडिओ शेअर केला होता. अन्वीला भाऊ झाला आहे. असं म्हणत मी गंमत म्हणून हे सगळं केलं होते. मात्र यानंतर अंशूला खूप मेसेज, फोन आले. आम्ही अंशुला सांगितलं होतं की, हे एप्रिल फूल आहे म्हणून सांग. यानंतर अंशुमनला खूप कॉल, मेसेज आले त्याचा त्याला खूप त्रास होतोय.
त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सगळं थांबवा. आम्हाला एकच मुलगी आहे. आम्ही आधीच ठरवलं आहे की, जे काही असेल ते आपल्याला एकच असेल मग ते मुलगा असो किंवा मुलगी. त्यामुळे हे सगळं थांबवण्याची विनंती अंशुमनच्या पत्नीनं या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
महत्वाच्या बातम्या :