Corona | मुंबई : मागिल दोन वर्ष आपण महाभयंकर कोरोना (Corona) सारख्या संसर्गजन्य रोगामुळे त्रस्त झालो होतो. यावर्षी कुठेतरी परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे आताकुठे सर्व सण, उत्सव आधी सारखे साजरे केले जात आहे. वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी काही दिवसातच येणार आहे. परंतू अशातच काही देशांमध्ये कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. यासंदर्भातील माहिती आरोग्य संघटनेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन (Sommya Swaminathan) यांनी दिली आहे.
कोरोना (Corona) रोगाची पुन्हा लाट येण्याचा WHO चा इशारा
सौम्या स्वामीनाथन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा व्हेरिअंट असणाऱ्या ओमायक्रॉनच्या XBB सबव्हेरियंटसह संक्रमणाची दुसरी लाट येऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनचे जवळपास 300 सबव्हेरियंट आहेत. यामधील XXB हा सध्या चिंता वाढवणारा आहे. हे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवरही मात करु शकतात. त्यामुळे काही देशांमध्ये XXB मुळे कोरोनाची आणखी लाट येऊ शकते.
आम्ही BA.5 आणि BA.1 यांच्या मुख्य कारणांचा मागोवा घेत आहोत. तसेच नवे सबव्हेरियंट अती-धोकादायक असल्याची माहिती अद्याप कोणत्याही देशाकडून आली नसल्याचं सौम्या स्वामीनाथन यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्ही कोरोना साथ संपली असं सांगितलेलं नाही. याचा अर्थ आपल्याला सर्व काळजी घ्यायची असून साधनांचा वापर करायचा आहे. आता आपल्याकडे अनेक साधनं तसंच लसी उपलब्ध आहेत ही चांगली बाब असल्याचं स्वामीनाथन यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी असंही सांगितलं की,जगभरात आठवड्याला आठ ते नऊ हजार लोकांच्या मृत्यूची नोंद होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Athavle | शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, रामदास आठवले म्हणाले…
- Rupali Thombre | चंद्रशेखर बावनकुळे यांना हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज – रुपाली ठोंबरे
- Uddhav Thackeray | “कोणाला तरी उभा करून विनंती करवून घेतली”; उद्धव ठाकरेंचा भाजप-मनसेवर पलटवार
- Chandrashekhar Bawankule | “आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिलं, भविष्यात…”; बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक टोला
- Dipali Sayyed । सुषमा अंधारे यांच्यामुळे दिपाली सय्यद ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार?