महाभियोग कारवाई दरम्यान ट्रम्प यांचा आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध

ट्रम्प

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या संसद परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर प्रखर टीका होत आहे. त्यानंतर अस्थिर डोनाल्ड ट्रम्प न्यूक्लियर हल्ला करू शकतात अशी चिंता अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नैंसी पेलोसी यांनी व्यक्त केली होती. तर त्यांनी ट्रम्प यांच्याकडे तात्काळ राष्ट्रध्यक्षपद सोडण्याची मागणी केली होती.

ट्रम्प यांचा कार्यकाळ 20 जानेवारी ला संपणार आहेत्यानंतर अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती चे हे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. यासाठी शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ट्रम्प यांच्या आगामी पाऊल उचलण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

एकीकडे कारवाई सुरु असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये “हिंसाचार मी विश्वास ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीविरोधात तसंच आपल्या चळवळीविरोधात आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “माझा खरा समर्थक असा राजकीय हिंसाचार करणार नाही. माझा कोणताही समर्थक अशा पद्धतीने कायद्याचा आणि आपल्या ध्वजाचा अपमान करणार नाही. आपल्या नागरिकांना अशा पद्धतीनं धमकावणार नाही. यापैकी तुम्ही काहीही केलं असेल तर तुम्ही चळवळीला पाठिंबा देत नाही आहात. तुम्ही त्यावर हल्ला करत आहात. तुम्ही आपल्या देशावर हल्ला करत आहात आणि हे सहन केलं जाणार नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी यावेळी कॅपिटॉल हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं आहे. “कोणतीही माफी, अपवाद नाही. अमेरिकेत कायद्याचं राज्य असून हिंसाचारात सहभागी झालेल्यांना योग्य शिक्षा केली जाईल,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

विशेष म्हणजे या व्हिडीओत ट्रम्प यांनी महाभियोग कारवाईचा उल्लेखही केला नाही. मात्र यावेळी त्यांनी काही सोशल मीडिया कंपन्यांनी टाकलेल्या बंदीचा उल्लेख केला. हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “आपल्या काही लोकांना सेन्सॉर किंवा ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रयत्न चुकीचे आणि घातक आहेत. सध्या आपण एकमेकांचं ऐकून घेण्याची गरज आहे, एकमेकांना शांत करण्याची नाही,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या