भाजपाच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाचा विळखा

bjp flag

मिरज : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. आता पर्यंत अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींपासून ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत अनेक जण हे कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत.

आता, सांगली जिल्ह्यातील मिरजचे भाजपा आमदार सुरेश खाडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर येत आहे. आमदार सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खाडे हे ६२ वर्षीय आहेत. मनपा उपायुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबातील एकूण ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याने मिरजेत खळबळ उडाली आहे.

मीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात तब्बल १३ हजार ४०८ (१३,४०८) रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याने कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा सलग दुसऱ्या दिवशी देखील १० हजारा पार गेला आहे. काल हे दिलासादायक आकडे जरी समोर आले असले तरी संकट मात्र कायम आहे. राज्यात काल दिवसभरात १२ हजार ७१२ (१२,७१२) नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हा आकडा देखील वाढता असून गेल्या काही दिवसातील उच्चांक आहे.

…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती

तर, काल ३४४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा हा १८ हजार ६५० झाला असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ लाख ४८ हजार ३१३ झाला आहे. गेल्या २४ तासांत, १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. वाढत्या कोरोनामुक्त रुग्णांच्या आकड्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे झाले आहे. तसेच, राज्यात सद्या एकूण १ लाख ४७ हजार ५१३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये