पुलवामात लष्कर – दहशतवाद्यांमध्ये चकमक, मेजरसह चार जवान शहीद

टीम महाराष्ट्र देशा: पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्याच्या जखमा ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. पुलवामा येथील पिंगलान भागामध्ये चकमक झाली आहे.

पुलवामा हल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. या दरम्यान पिंगलान भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जवान जखमी झाला आहे

शहीद झालेल्या जवानांमध्ये मेजर डी.एस. डोंडीयाल यांचा समावेश असून, सावेराम, अजय कुमार, हरी सिंग या जवानांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. हे जवान ५५ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफमधील असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान. एका बाजूला सीआरपीएफ हल्याच्या जखमा ताज्या असतानाच आज आणखीन जवान शहीद झाल्याने देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...