Karnataka Election; भाजपला आणखी एका आमदाराचा पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्ष्यांमध्ये रस्सीखेच सुरु असताना आता आकड्यांचा खेळ सुरु आहे. केपीजीपी या पक्षाचे आमदार आर.शंकर यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. शंकर यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे भाजपची संख्या १०५ वर गेली आहे. येडीयुरप्पा जेव्हा राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा ते सोबत होते.

दरम्यान,जेडीएस चे नेते कुमारस्वामी यांनी भाजपवर शरसंधान केलं आहे. भाजप सत्तेसाठी हपापलेली असून भाजप जेडीएस ला संपवायला निघाली होती त्यामुळे त्यांसोबत जाण्याचा प्रश्नच नाही असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भाजपने धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फुट पाडल्याचा देखील आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

थोड्यावेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कुमारस्वामी यांनी भाजपवर निशाना साधला आहे. पाठींबा दिल्याबद्दल कॉंग्रेसचे आभार देखील कुमारस्वामी यांनी मानले. तर कुमारस्वामी यांचे भाऊ रेवण्णा यांनी भाजपने १०० कोटी रुपयांची ऑफर दिली तसेच केंद्रात मंत्रिमंडळात स्थान आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याचं आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.

 

You might also like
Comments
Loading...