कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर टीम पेनचा आणखी एक धक्कादायक निर्णय

कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर टीम पेनचा आणखी एक धक्कादायक निर्णय

tin pain

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टीम पेन (Tim Paine) ने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता टीम पेनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला असल्याची माहिती दिली आहे. टीम पेनने अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वांना धक्का बसला आहे.

टीम पेनचे व्यवस्थापक जेम्स हेंडरसन यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, टीम पेन त्याच्या मानसिक आरोग्यामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेत आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे टीम पेनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, आम्ही त्याच्याबद्दल आणि त्याच्या पत्नीबद्दल खूप चिंतित आहोत आणि या कारणास्तव यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही.

याआधी टीम पेनने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. आपल्या सहकारी महिलेला केलेल्या अश्लील मेसेज प्रकरणानंतर टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 2017 मध्ये एका मुलीला अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल टीम पेनने हे पाऊल उचलले होते. हा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: