fbpx

देशात अजून एका राफेलच्या चर्चेंना उधान , आई-वडिलांवरच दाखल अतिशय विचित्र खटला

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात आणि संसदेत सुद्धा राफेलच्या चर्चेंनी तुफान उडवलं असताना असाच अजून एक राफेल आता देशात चर्चेंना कारण बनला आहे आणि राफेल आहे राफेल सॅम्युएल. राफेल सॅम्युएल असे नाव असलेला हा तरुण स्वतःच्या आई-वडिलांवरच खटला दाखल करणार आहे. माझी परवानगी न घेताच मला जन्म का दिलात, असा त्याचा सवाल असून, त्याचे उत्तर त्याने आई-वडिलांकडे मागितले आहे.

27 वर्षीय राफेलने अत्यंत विचित्र प्रकरणात आपल्या आई-वडिलांवर खटला दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. माझी परवानगी न घेता मला जन्म का दिलात, याचा जाब राफेलने आपल्या पालकांकडे मागितला आहे.

तरुण वयातले दोन भिन्न लिंगी मानव एकत्र येतात, त्यातून मुलांचा जन्म होतो; पण मुलांना जन्म देणे हे काही आई-वडिलांचे कर्तव्य नसते. मुले आई-वडिलांचे काहीच देणे लागत नाहीत. याच विचित्र विचारांतून राफेलने आपल्या जन्मदात्यांवर खटला दाखल केला आहे. मात्र,एवढे सगळे करूनही माता-पित्यांशी कटू संबंधनसल्याचे राफेल म्हणतो. पालकांवर प्रेम असून माझा लढा वैचारिक पातळीवर असल्याचे तो सांगतो. माझे आयुष्य छान असले; तरी अशा पद्धतीने मी आणखी मनुष्य जन्माला घालून जगाचा विनाश करू इच्छित नाही. मनुष्य जन्माला घातल्यावर पुन्हा त्यांना शिक्षण, नोकरी यासारख्या चक्रात अडकावे लागेल.

माणसाने माणसाला जन्माला घालून जगाचा संहार करू नये, असे त्याचे ठाम मत आहे. हे सांगून तो गप्प बसलेला नाहीय; तर त्याने स्वतःच्या विचारांची मांडणी करण्यासाठी फेसबुक पेज तयार केले आहे. तिथे तो आपल्या मुक्त जगाच्या संकल्पना मांडत असतो. राफेल सॅम्युएलचे विचार मानणारे लोकही त्याच्या पेजवर आवर्जून भेट देतात.