काकडे आणि बापटांचं जुळलं ? बापट तीन लाख मताधिक्याने विजयी होतील काकडेंच आणखी एक भाकीत

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट साहेब 3 लाख मताधिक्याने निवडून येतील आणि वडगावशेरी विधानसभेच्या 4 लाख 30 हजार मतदानात 70 हजाराहून अधिकचे मताधिक्य भाजपला मिळेल, असा विश्वास भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वडगावशेरी विधानसभा मतदार संघाच्या बैठकीत व्यक्त केला.

वडगावशेरी विधानसभा मतदार संघात 2014 साली भाजपाचा एक नगरसेवक होता तर, 2017 साली भाजपाचे 17 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. विधानसभेला भाजप, शिवसेना व रिपाइंला 1 लाख 37 हजाराहून अधिक मतदान झाले आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत वडगावशेरीमध्ये भाजपाला 1 लाख 20 हजारांहून अधिक मतदान झाले असून 2014 साली एक नगरसेवक असलेल्या भाजपाचे आता 17 नगरसेवक आहेत. भाजपाची ताकद 17 पटीने वाढली असून आलेख चढता राहिला आहे. पक्षाची ताकद वाढल्याने वडगावशेरीमध्ये मागच्या तुलनेत यावेळी जास्त मताधिक्य मिळेल अस संजय काकडे म्हणाले आहेत.

भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी विधानसभा मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काकडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार जगदीश मुळीक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक संजय भोसले, नगरसेवक अविनाश साळवे, नगरसेविका शितल सावंत, नगरसेविका मुक्ता जगताप, नगरसेविका श्वेता गलांडे, ॲड. आयुब शेख, मंदाताई खुळे, रघुनाथ कुचिक आणि भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी उपस्थित होते.

वडगावशेरी मतदार संघ आपण पिंजून काढला असून गिरीश बापट यांचा विजय आता निश्चित आहे. तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात झालेल्या विकासकामांना मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन यावेळी केले. यासगळ्यात बापट आणि काकडे यांच्या असलेले विप्तुष्ट यानिमित्ताने कमी झाल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.