‘गॉड, सेक्स और ट्रुथ’मधून आणखीन एक पॉर्न स्टार बॉलीवूडमध्ये

टीम महाराष्ट्र देशा: सनी लिओनीच्या बॉलीवूड पदार्पणानंतर अनेक पॉर्न स्टार बॉलीवूडच्या वाटेवर असल्याच दिसत आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी गॉड, सेक्स और ट्रुथ’ या चित्रपटातून फेमस पॉर्न स्टार मिया मिल्कोवा हि हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

गॉड, सेक्स और ट्रुथचे पोस्टर राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटर वर पोस्ट केल आहे. या चित्रपटातून सेक्स आणि ट्रुथ बद्दल मांडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान या चित्रपटाचे बोल्ड पोस्टर सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

तर ‘सनी लिओनीनंतर बॉलीवूडमध्ये भूमिका निभावणारी दुसरी अडल्ट स्टार असून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्‍यासोबत चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली,’ असल्याचे ट्विट मियाने केले आहे.

Gadgil