आरसीबीच्या ताफ्यातील आणखी एक खेळाडू कोरोनाग्रस्त

आरसीबी

चेन्नई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे.

आयपीएल 2021 सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. दरम्यान,आयपीएल सुरु होण्याआधी दिल्ली कॅपिटल्ससह चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला मोठा धक्का बसला होते. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली होते. तर चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टाफ मेंबर हे कोरोना संसर्गग्रस्त आढळले आहेत. यातच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली आहे. पडिक्कलला आता इतर खेळाडूंपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. आरसीबीची पहिली मॅच ही 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

त्यांनतर आता आरसीबीचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनिएल सॅम्स याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो आता आयसोलेशन मध्ये आहे. आरसीबी ने ट्विट केलं की, ‘३ एप्रिलला डॅनिएल सॅम्स चेन्नईच्या हॉटेलमध्ये आला तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. ७ दुसऱ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट ७ एप्रिलला हाती आला आणि तो पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. RCBची वैद्यकिय टीम त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे.’

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ :

विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंगटन सुंदर, पवन देशपांडे, फिन एलेन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अ;ॅडम जंपा, काईल जेमीसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चन, के एस भारत, सुयश प्रभुदेसाई डैनियल सैम्स, हर्षल पटेल.

महत्त्वाच्या बातम्या