जोगेश्वरीतून आणखी एक जण ताब्यात, ‘त्या’ संशयिताशी असू शकते कनेक्शन

ATS

मुंबई : महराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने एकत्रित केलेल्या कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव जाकीर असून त्याचा दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच मुंबई धारावी येथील रहिवासी असलेला जान मोहम्मद या संशयित अतिरेक्याशीही त्याचा संबंध असल्याचे व्यक्त केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

दरम्यान जाकीर हा जान मोहम्मद याचा हँडलर असून जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितलं, असा पोलिसांना संशय आहे. या अगोदर दिल्ली पोलिसांनी देशभरातून ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामुळे देशभरात खळबळ माजली. या अतिरेक्यांच्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता. मात्र दिल्ली पोलिसांनी हा कट उधळून लावला. मात्र आता जोगेश्वरी येथून आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या