एटीएसची धडक कारवाई, मुंब्र्यातून आणखी एकाला अटक

crime

ठाणे : दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा येथील तलाह उर्फ अबु बकार हनीफ पोतरिक या 24 वर्षीय तरुणाला अटक केली.काल औरंगाबाद येथील न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाने त्याला हजर केले. न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तलाह हा बॅचलर ऑफ मनेजमेंटचा विद्यार्थी आहे.हा तरुण मुंब्रा येथील ऍम्ब्रॉड टॉवरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून भाड्याने राहत आहे. यापूर्वी अटक झालेल्या नऊ संशयित ओरोपींसोबत आणि देशद्रोही संघटनेशी तलाहचा संबध असल्याचा संशय आहे.

लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क असे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी रविवारी न्यायालयाला दिली. यापूर्वी पकडलेल्या आरोपींचा तो प्रमुख साथीदार असल्याचा संशय आहे, असही पोलिसांनी सांगितले.