fbpx

बीडमध्ये भाजपला आणखी एक धक्का ‘या’ संघटनेचा बजरंग बप्पाला पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदार संघात अतिशय चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांना पाठींबा दिला असताना, दुरीकडे भाजपचे सहकारी असणारे विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला बीडमध्ये जाहीर पाठींबा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांना ” महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार , मुकादम व वाहतूक संघटना” यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या भविष्याचा विचार करून तसेच धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला असल्याचं संघटनेचे राज्य सचिव प्रदीप भांगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. बीडमध्ये आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आज ”महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार , मुकादम व वाहतूक संघटना” यांनी आज जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.