नाशिक : नाशिक (Nashik) येथील मिरची चौक येथे आज पहाटे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या अपघाता प्रायव्हेट बसने पेट घेतला असून १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपुर्ण शहर हादरलं असतानाच नाशिकमध्ये पुन्हा एका बसने पेट घेतला असल्याची बातमी समोर आली आहे. आज दिवसभरात दोन बसांनी पेट घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
नांदुरी (Nanduri) येथून निघालेल्या बसने नाशिकच्या वणी गडावर पेट घेतला आहे. या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून कोणतीही जीवत हानी झालेली नसल्याचं समोर आलं आहे. पहाटे देखील प्रायव्हेट बसने पेट घेतला असल्याची बातमी ताजी असतानाच ही घटना घडली आहे.
नाशिक येथे भीषण अपघात –
नाशिक येथील मिरची चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची (Chintamani Travels) प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत धडकली. यानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. यामध्ये १२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या अपघातात १२ जणांचा मृत्यू धाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक प्रवाश्यांनी खडकीतून उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. तब्बल अर्धा तास या गाडीने पेट घेतला.
दरम्यान, ही घटना लोकांच्या निदर्शनास येताच खळबळ उडाली असून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या ३४ जणांवर उपचार सुरु आहेत.
प्रवासा आधी बसचा फिटनेस मेंटेनन्स नियमितपणे तपासला जातो, प्रत्येक फेरीपूर्वी ही तपासणी केली जाते अशी माहिती संचालकांनी दिली आहे. मात्र, शॉर्टसर्किट झाल्याने बस ने पेट घेतला असू शकतो, असा अंदाज ट्रॅव्हल कंपनीच्या संचालकांनी वयक्त केला आहे. या बस मध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त भरले असल्यास आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Adipurush | “आजच्या काळातील क्रूर” ; ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लुकवरून सुरू असलेल्या टीकांवर ओम राऊत यांची प्रतिक्रिया
- Nashik Accident | “सकाळी मला कंडक्टरचा फोन आला, तो पॅसेंजरला उठवायला मागे गेला अन्…”, कंपनीने सांगितला ‘तो’ प्रसंग
- Aanand Dave | “पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे”
- Eknath Shinde | शिंदे गट नोंदणीकृत नाही, मग दसरा मेळाव्यात खर्च करण्यासाठी पैसे आले कुठून?, याचिकेतील ‘हे’ आहेत महत्वाचे मुद्दे
- Nashik Accident | नाशिक अपघातातील मृत्यूंच्या संख्येत वाढ, दहा नाही तर बारा जणांचा मृत्यू