मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत…

maratha kranti morcha

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल, तर आमदारांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहे. रिसोडचे काँग्रेस आमदार अमित झनक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बुधवारी नाशिक बंद यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनानंतर नाशिकमधील काही सत्ताधारी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, हे राजीनामे म्हणजे केवळ ढोंग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या राजीनाम्याला काहीही महत्त्व नसून आमदारकीचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे देणे अपेक्षित असून, त्यांनी अध्यक्षांकडे राजीनामे द्यावेत.असा देखावा करणे चुकीचे असल्याचा आरोप माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी केला आहे.

आमदारांचे राजीनामासत्र सुरूच, भारत भालके आणि सीमा हिरे यांनीही दिला राजीनामा

मराठा आरक्षणासाठी आणखी एका मराठा आमदाराचा राजीनामा

आता पर्यंत कोणी कोणी दिला राजीनामा ?

  • कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वप्रथम आपला राजीनामा सादर केला.
  • वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही आपला राजीनामा दिला आहे.
  • इंदापूरचे आ. दत्तात्रय भरणे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला.
  • मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • मोहोळचे आमदार रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत. मात्र, त्यांनी तुरुंगातूनच आपला राजीनामा दिला.
  • नाशिकमधील देवळा चांदवड मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी देखील राजीनामा दिला आहे.Loading…
Loading...