यष्टीरक्षक धोनीचा मोठा विक्रम

१०० यष्टिचित करणारा पहिला खेळाडू

कोलंबो : भारताच्या यष्टीरक्षक एमएस धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये १०० स्टॅम्पिंग अर्थात यष्टिचित करणारा तो जगाच्या पाठीवरचा पहिला यष्टीरक्षक बनला आहे.

यापूर्वी हा विक्रम कुमार संगकारा आणि एमएस धोनी यांच्या नावावर संयुक्तपणे होता. कुमार संगकाराने ४०४ वनडे सामन्यात ही कामगिरी केली होती तर धोनीला अशी कामगिरी करायला केवळ ३०१ वनडे सामने लागले आहेत.

आता वनडे क्रिकेटमध्ये १०० स्टंपिंग एमएस धोनीच्या, कसोटीमध्ये ५२ स्टंपिंग बेर्ट ओल्डफिएल्डच्या तर टी२० मध्ये ३२ स्टंपिंग पाकिस्तानच्या कामरान अकमलच्या नावावर आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सार्वधिक यष्टिचित करणारे खेळाडू

१०० एमएस धोनी (३०१ सामने )

९९ कुमार संगकारा (४०४ सामने )

७५ रमेश कालुवितरणा (१८९ सामने )

७३ मोईन अली (सामने २१९)

५५ ऍडम गिलख्रिस्ट (सामने २८७)

You might also like
Comments
Loading...