धक्कादायक : महाराष्ट्राच्या अजून एका मोठ्या मंत्र्याला कोरोनाची लागण

corona

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे,. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आजच ५० हजारांच्या पुढे गेला आहे. हा नेता नजीकच्या काळात विधानपरिषद निवडणुकीसाठी मुंबई येथे गेला होता.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. रविवारी(दि.24) राज्यात 3,041 नवीन रुग्ण मिळाल्या नंतर राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 50,231 झाला आहे. तसेच, आज 58 कोरोना संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे. आता राज्यातील मृतांचा आकाड 1,635 झाला आहे. रविवारी मृत्यू झालेल्या कोरोना संक्रमितांमध्ये 39 मुंबई, 6 पुणे, सोलापूर 6, औरंगाबादसे 4, लातूर 1, मीरा-भायंदर 1 आणि ठाण्यातील 1 रुग्णांचा समावेश आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आली आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाबाबतीत सकारात्मक बदल दिसून आला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 3 हजार 41 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे.