राष्ट्रवादीचा आणखी एक नेता करणार शिवसेनेत प्रवेश

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. खासकरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी या पक्षांतरामध्ये आघाडी मारली आहे. हे पक्षांतर खासकरून भाजप – सेनेमध्ये होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप सेनेची ताकद वाढत आहे. आता माण खटावचे एके काळी राष्ट्रवादीत असलेले शेखर गोरे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबतचे वृत्त ABPमाझा या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

काही दिवसांपुर्वीच शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकला होता. त्यापूर्वी शेखर गोरे चांगलेचं चर्चेत आले होते. फलटणमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत खुद्द शरद पवार यांच्या समोर राडा घातला होता. पक्षातील कोणीही पवारांच्यापुढे मोठ्या आवाजाने बोलण्याची हिंमत करत नसताना गोरे यांनी घातलेला राडा गाजला होता. त्यानंतर पक्ष अंतर्गत वाद झाले आणि शेखर गोरे यांनी पक्षाला राम-राम ठोकला.

दरम्यान शेखर गोरे हे माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ आहेत, गोरे यांनी आपल्याच भावाच्या विरोधात जात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे बहुमत असताना देखील गोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. पक्षातील गटबाजीमुळेच आपण पराभूत झाल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता. शेखर गोरे आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे माण-खटावमध्ये कॉंग्रेस आघाडीला शेखर गोरे यांच्यामार्फत शिवसेना आव्हान देणार असल्याचं दिसत आहे.

बुडत्या जहाजातून पहिल्यांदा उंदरंचं बाहेर पडतात, राष्ट्रवादी उपाध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया

हि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री

महाडेश्वर पुन्हा अडचणीत, संतप्त होऊन महिलेचा पिरगळला हात