आणखी एक नेता पंकजा मुंडेंच्या गळाला, असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात बदल होताना दिसत आहेत. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उत्तम माने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडून भाजपात प्रवेश करीत, असल्याचे स्पष्टीकरण उत्तम माने यांनी दिले आहे.

यावेळी पंकजा मुंडे यांनीही उत्तम माने यांचे पक्षात स्वागत करत विरोधकांवर टीका केली आहे. माफियागिरी आणि गुंडगिरीला खतपाणी घालणारा नेता हवा की विकासाला गती देणारा नेता हवा असा सवाल करून आगामी काळात तरूणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम करणार असून याकामी आपण साथ द्यावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसात भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. खासकरून बीड जिल्ह्यात याचे प्रमाण अधिक असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस नेते प्रा. टी. पी. मुंडे यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे याचा फायदा पंकजा मुंडे यांना होणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...