अजित पवारांकडे अजून एक महत्वाची ‘जबाबदारी’ ; काय आहे प्रकरण त्यासाठी ही बातमी नक्की वाचा

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचं उद्धव ठाकरे सरकारमधील प्रस्थ आणखीन वाढलं आहे, अशी चर्चा या निमित्ताने विधिमंडळात सुरु झाली आहे. अजित पवार यांची आज विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदाची घोषणा झाली. या पदाच्या निमित्ताने सभागृहातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर अजित पवार यांची सभागृह नेते म्हणून भूमिका महत्त्वाची असणार आहे. सभागृहात पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्यावर मार्ग काढणे, विरोधकांशी संवाद साधणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अजित पवार यांच्याकडे असणार आहेत.

आज विधान परिषदेचे कामकाज अवघ्या १३ व्या मिनिटाला संपलं. राज्याचे उपमुख्यमंत्री यापूर्वी सुभाष देसाई सभागृहाचे नेते होते. नेतेपदी निवड झाल्यामुळे अजित पवार यांचं सभागृहातील स्थान आणखीनच बळकट झालं आहे.सुभाष देसाई यांच्यापेक्षा अजित पवार यावर अधिक प्रभावीपणे काम करतील याची खात्री असल्याने त्यांच्याकडे हे पद देण्यात आल्याची चर्चा आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या नावासंदर्भातील घोषणा केली.

Loading...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिला अत्याचार याविषयांवर स्थगन मांडण्याचा प्रयत्न केला. पण सभापती निंबाळकरांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे भाजप आमदारांनी वेलमधे येऊन घोषणा केली.

शेतक-यांची फसवणूक करणा-या सरकारचा धिक्कार असो,विधान परिषदेत घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान गोपीकिशन बाजोरिया, अनिकेत तटकरे, अनिल सोले, दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांची तालिका सभापतीपदी घोषणा करण्यात आली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
प्रसिद्धीची पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना गरज नाही, देशमुखांनी आव्हाडांना झापलं