भाजपची डोकेदुखी वाढली, एनडीएतून आणखी एका मित्रपक्षाने दिले बाहेर पडण्याचे संकेत

भाजप

टीम महाराष्ट्र देशा– राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) साथ सोडल्यांनतर आता लोकजनशक्ती पार्टीनेही एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय मंत्री व लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे चिरंजीव आणि पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आज त्याबाबतचे ट्विट केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांबरोबर जागावाटपाची बोलणी झाली; मात्र त्यामध्ये ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर वेळेत तोडगा न निघाल्यास एनडीएचे मोठे नुकसान होऊ शकते असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे.

एनडीएतील सहकारी पक्षांना भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने याआधीच टीडीपी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीने एनडीएची साथ सोडली आहे. भाजपची साथ लोकजनशक्ती पार्टीने सोडल्यास बिहारमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. एनडीएची स्थिती नाजूक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने यामधून काहीतरी धडा घेत सहकारी पक्षांना सन्मानाची वागणूक देणे आवश्यक असल्याचे पहिले ट्विट चिराग पासवान यांनी केले होते. त्यांनतर काही वेळातच दुसरे ट्विट करत एनडीएत सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले.Loading…
Loading...