मराठा आरक्षणासाठी विष पिलेल्या जगन्नाथ सोनावणेंचा मृत्यु, आरक्षणासाठी राज्यात दुसरा बळी

औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या जगन्नाथ सोनावणे ( वय. ५५ वर्ष ) यांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, काल महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर देवगाव रंगारी येथे आंदोलन करण्यात येत होते, यावेळी सोनावणे यांनी विष प्राशन केले होते. दरम्यान, आजवर शांततेच्या मार्गाने सुरु असणारे आंदोलन आता हिंसक होताना दिसत आहे,

दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने गोदावरी नदीत उडी घेत जलसमाधी घेतली होती, शिंदे यांच्या मृत्युच्या निषेधार्थ काल महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, त्यानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात दुसरा बळी घेला आहे. दरम्यान, जगन्नाथ सोनावणेच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलक आणखीनच आक्रमक होताना दिसत आहेत.

दरम्यान, काल झालेल्या महाराष्ट्र बंदनंतर आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंद पाळण्यात येत आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी ठिय्या देत लोकल रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला आहे.

You might also like
Comments
Loading...