भाजपमध्ये ये नौकरी देतो; गिरीश बापट यांची तरुणाला थेट स्टेजवरून ऑफर

पुणे: पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट बोलण्याच्या ओघात काय बोलून जातील हे सांगता येत नाही. कधी ‘तसले व्हिडियो’ बघण्याचा विषय असो कि ‘चल म्हणली कि निघाल्या’चे विधान, गिरीश बापट हे कायम आपल्या बोलण्याने वादात सापडल्याच दिसून आल आहे. आता त्यांनी स्टेजवरून थेट तरुणाला ‘भाजपमध्ये ये, रोजगार देतो, नौकरी देतो’ अशी खुली ऑफर दिली. आता एवढं बोलून थांबतील ते बापट कसले. पुढे त्यांनी या तरुणाला ‘एकच बायको करण्याचा’ मिश्कील सल्ला देखील देवून टाकला.

पुण्यातील सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड वखार महामंडळपर्यंत 650 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेय त्याचे भुमीपुजन आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक आदी उपस्थित होते.

उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गिरीश बापट हे बोलत असताना एक तरूण फोनवर बोलत होता. यावेळी त्या तरुणाला उद्देशून ते म्हणाले ‘होऊ दे भाऊ, तुझा फोन होऊ दे..बायकोशी घे बोलून तेवढं! बिगर लग्नाचा असशील तर मग भाजपमध्ये ये, तुला रोजगार देतो, नोकरी देतो, फक्त एकच लग्न कर’ असा सल्ला त्यांनी देवून टाकला. दरम्यान, बापट यांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला होता.

You might also like
Comments
Loading...