आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश

भोंदूबाबा

मुंबई: नालासोपारा मधील संतोष भुवन येथून भूत उतरवण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे करणा-या भोंदू बाबाला अटक करण्यात आली. रमेश यादव उर्फ अवघडबाबा असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.अवघडबाबा याने महिलेला तुझ्या अंगात भूत आहे. ते उतरवण्यासाठी त्याने पीडितेला एका ठिकाणी बोलावले. तेथे त्याने तिला एका अंधाऱ्या खोलीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित महिला तेथून पळून जाण्यास यशस्वी झाली