मुंबई : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून राज्याचे अन्न पुरवठा आणि नागरी संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असून गेल्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.#COVID19
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 22, 2021
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत ही संचारबंदी लागू असेल. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १ हजार रुपये दंड आणि प्रसंगी गुन्हा दाखल करायचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- हिंगोली जिल्ह्यात संसर्ग वाढला; मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार कोविड केंद्र
- अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; नवीन वाहतूक नियम धाब्यावर
- सासरच्या छळाला कंटाळून विवाविहतेची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल
- पनवेलमध्ये मायलेकीचा खून करून फरार झालेल्या आरोपीची हिंगोलीत आत्महत्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; ५१५ नव्या रुग्णांची भर, ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू