भारताला अजून एक धक्का, जाडेजा पाठोपाठ हनुमा विहारी देखील चौथ्या टेस्टला मुकणार

hanuma vihari

सिडनी : जखमी हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांची खेळपट्टीवर उभी राहण्याची जिद्द आणि सयंमी बॅटिंगमुळे भारतानं सिडनी टेस्ट ड्रॉ केली आहे. ही टेस्ट ड़्रॉ झाल्यानं सध्या ही सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. आता या सीरिजचा फैसला चौथ्या टेस्टमध्ये होईल.

चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतर विहारी-अश्विन जोडी जमली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सर्व बॉलर्सचा धैर्यानं सामना केला. टेस्ट क्रिकेटमध्ये पाचव्या दिवशी बॅटिंग करणं हे आव्हान होतं. ते आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं. विहारी 161 बॉलमध्ये 23 तर अश्विन 128 बॉलमध्ये 39 रन काढून नाबाद राहिला. या दोघांची ही अविस्मरणीय झुंज क्रिकेट फॅन्सच्या नेहमीच स्मरणात राहणार आहे.

यातच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा यापूर्वीच या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यातच आता अजून एक फलंदाज ब्रिस्बेन कसोटी सामन्याला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिडनी कसोटी सामन्यात  हनुमा विहारी मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही, तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येदेखील विहारी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, बीसीसीआयमधील सूत्रांनी असे सांगितले आहे की, चौथ्या कसोटी 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे, या सामन्यापर्यंत हनुमा विहारी फिट होऊ शकणार नाही. हा त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळणार नाही. सामना संपल्यानंतर हनुमा विहारीच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले. याचा रिपोर्ट मंगळवारी (आज) संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे. या रिपोर्टनंतरच विहारीच्या दुखापतीबाबत माहिती मिळेल. ही दुखापत ग्रेड वन श्रेणीतील असली तरी त्याला पुढील चार आठवडे खेळता येणार नाही. त्यानंतर त्याला रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जावं लागेल. केवळ ब्रिस्बेन टेस्टच नव्हे तर इंग्लंडविरोधात भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेलाही तो मुकणार आहे.

महत्वाच्या बातम्या