चेन्नईला अजून एक धक्का हा खेळाडू संघाबाहेर,धोनीची चिंता वाढली

chenai super kings

मुंबई: डावखुरा खेळाडू सुरेश रैना मायदेशी परतल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणी आणखी वाढतच आहेत. याआधी चेन्नईच्या 14 सदस्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती. आणि आता एक अनुभवी खेळाडू संघासाठी खेळेल की नाही याबाबत अजून शंका आहे म्हणून संघाशी चिंता वाढत चालली आहे.

आयपीएल खेळण्यासाठी चेन्नईचा अनुभवी खेळाडू हरभजनसिंह हा 1 सप्टेंबरपर्यंत युएईमध्ये दाखल होणार होता. पण 1 सप्टेंबरपर्यंत तो तिथे  पोहचलेला नाही. त्यानंतर हरभजन काही दिवसांनी चेन्नईत दाखल होईल, अस संघ प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र तसं काही झालं नाही. त्यामुळेच हरभजन सिंहने चेन्नई सुपर किंग्जला सोडचिठ्ठी दिल्लीचं वृत्त दैनिक जागरणने दिले आहे.

याआधी हरभजन सिंग मुंबईकडून खेललेला आहे. अत्यंत प्रभावी गोलंदाजी, फिरकीने तो फलंदाजांंवर अंकुश ठेवतो. अशी त्याची ओळख आहे. हरभजन यावर्षी चेन्नईकडून खेळणार नाही, अस वृत्त अनेक माध्यमांंनी याआधीच प्रसिद्ध केले  होते. हरभजनच्या काही जवळच्या मित्रांचं अस म्हणणं आहे की, एकतर हरभजन दुबईला जाण्याची तारिख बदलू शकतो किंवा यावर्षीच्या आईपीएलमधून माघार घेऊ शकतो.

सुरेश रैना नंतर हा चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का बसला आहे. आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चिंता वाढलेली आहे.अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज आपल्या संघात काय बदल करते हे बघणं महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या -:

मोदींच्या आणखी एका व्हिडीओवर डिस्लाईकचा पाऊस, तरुणाईचा संताप

कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

नगर शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी; शहरातील रस्ते झाले  जलमय…