पंढरपूर निवडणुकीमध्ये भाजपला आणखी एक धक्का; ‘या’ हुकुमी एक्क्याला कोरोनाचा विळखा

देवेंद्र फडणवीस

सोलापूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

ही निवडणूक राष्ट्रवादीसह भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. या निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 8 एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

भाजपच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेले भाजप नेते व विधान परिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रचारामध्ये ते व्यस्त असताना त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षणे आढळले होते. आता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भाजपला निवडणुकी आधी आणखी एक धक्का बसला आहे. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या