भाजपला आणखी एक मोठा झटका! ‘या’ वरिष्ठ नेत्याने काढला नवा पक्ष

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला आणखी एक मोठा झटका बसला आहे. राजस्थानमधील भाजपचे वरिष्ट नेते आणि राजस्थानचे माजी मंत्री घनश्याम तिवारी यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. भाजपमधी नेत्यांची नाराजी वाढतच असून भाजपला आगामी निवडणुकांमध्ये याची किंमत मोजावी लागणार आहे.

घनश्याम तिवारी ‘भारत वाहिनी पार्टी’या नवीन पक्षाची स्थापना केली असून मुलगा अखिलेश तिवारीची त्यांनी पक्षाध्यक्षपदी नेमणूक केली आहे. अखिलेश तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्या पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला पूर्वीच्या पक्षाचा राजीनामा दिल्याशिवाय नव्या पक्षाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे घनश्याम तिवारी यानी अजूनही या पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे ही भाजपची खेळी आहे का ? अशी शंका देखील वर्तविण्यात येत आहे.

तिवारी गेल्या काही वर्षांपासून ते राजस्थान भाजपमधील नेत्यांवर नाराज होते. सरकारच्या धोरणावर त्यांनी सातत्याने टीकाही केली होती. दोन लोकसभा आणि एका विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवावरही त्यांनी राज्य नेतृत्त्वावर हल्लाबोल केला होता.

कोण आहेत घनश्याम तिवारी?

जयपूर जिल्ह्यातील नेते असलेले घनश्याम तिवारी १९८० पासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी यापूर्वीच्या भाजप सरकारमध्ये शिक्षणमंत्रीपद भूषवले आहे. १३ व्या विधानसभेत ते उपविरोधी पक्षनेते होते. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी ‘दिनदयाळ वाहिनी’ च्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केले आहेत.

You might also like
Comments
Loading...