Share

T20 World Cup | तडाखेबाज फलंदाजी करत ‘विराट कोहली’ने पटकावला आणखी एक पुरस्कार

टीम महाराष्ट्र देशा: यंदाच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातली आहे. अनेक सामन्यांमध्ये विराटने आपल्या बॅटिंगने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. विराटच्या या कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने विराटला ‘प्लेयर ऑफ द मंथ’ (Player of the Month) पुरस्काराने सन्मानित केले आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये ‘प्लेयर ऑफ द मंथ’ या पुरस्कारासाठी विराट कोहली सोबत झिंबाब्वे संघाचा सिकंदर रजा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही पुरुष गटातून नामांकित करण्यात आले होते. दरम्यान, हा पुरस्कार कोहलीच्या खात्यात आला आहे. विराट कोहलीने हा पुरस्कार पहिल्यांदाच पटकावला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये विराटने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला हा सन्मान मिळाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जवळपास तीन वर्षापासून खराब फॉर्मला झुंज देत आहे. मात्र, त्याने गेल्या तीन महिन्यात स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याचबरोबर टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये कोहलीने आत्तापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विराट कोहली तब्बल 246 धावा केले आहे.

यामध्ये विराटने 3 अर्धशतके केली आहे. तर, टी 20 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात देखील विराटने 64 गावांची नाबाद खेळी खेळली. नेदरलँड सोबत त्याने नाबाद खेळी खेळत 62 धावा केल्या.

7 नोव्हेंबर रोजी आयसीसीआयने ऑक्टोबर महिन्यासाठी पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम खेळाडूंना पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये पुरुष गटामध्ये विराट कोहली ने हा किताब पटकावला असून महिला गटांमध्ये पाकिस्तानच्या निदा दारलाने हा पुरस्कार मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: यंदाच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now