संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

नवी दिल्ली : भारतात कोरोना बाधितांचा आकडा 4000 पार गेला असून तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4000 कोरोना बाधितांपैकी 291 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे 58 नवीन रूग्ण आढळून आले. राज्यामध्ये आतापर्यंत संख्या 500 पार पोहोचली आहे. तर फक्त दिल्लीमध्ये 320 कोरोना बाधित आहेत.कोरोनापुढे अख्खं जग हतबल झालं असून भारतातही कोरोना फोफावत आहे. तसेच आंध्रप्रदेशमध्ये 34, महाराष्ट्रात 26, राजस्थानमध्ये सहा, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशमध्ये 12 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान, यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोना बाधितांचा एकूण आकडा 4000 वर पोहोचला आहे. तर देशात या व्हायरसमुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राजस्थान, गुजरातमध्ये प्रत्येकी एक-एक, महाराष्ट्रात तीन आणि तामिळनाडूमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दिल्लीला तबलीगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे. जे कुणी असं करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.