मोदींच्या नावाच्या घोषणा देत अमेरिकेत भारतीयांनी केले मोठ्या जल्लोषात पंतप्रधानांचे स्वागत

narendra modi

अमेरिका : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदींनी एअर इंडिया वन या विशेष विमानाने भारतातून अमेरिकेकडे रवाना झाले होते. भारताच्या वेळेनुसार आज सकाळी चार वाजेच्या ते अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. मोदी विमानतळावर येताच भारतीयांनी त्यांचे मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने स्वागत केले. स्वतः पंतप्रधानांनी यासंदर्भातील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोरोना प्रादुर्भावानंतर बांगलादेशचा दौरा सोडला तर पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांसह भारताचे अमेरिकेतील दूत तरनजीत सिंग संधू यांनी देखील मोदींचे स्वागत केले.

दौऱ्याला रवाना होतांना बुधवारी(२२ सप्टें.)मोदी म्हणाले होते की, अमेरिका भेटीत आपण भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीवर आधारित संबंध अधिक दृढ करणार असून जपान व ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबरचे संबंधही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील’.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या कोविड १९ शिखर बैठकीस मोदी उपस्थित राहणार असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले असून अफगाणिस्तानचा मुद्दा हा मोदी व बायडेन यांच्या द्विपक्षीय चर्चेत महत्त्वाचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच २४ सप्टें. ला सायंकाळी मोदी हे आमसभेच्या अधिवेशनासाठी न्यूयॉर्कला रवाना होणार आहेत. तसेच ते अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या